जळगावतील बेकायदेशीर दुमजली इमारत पाडली

0

जळगाव : नगररचना विभागात विवेकानंद नगर येथील शरद पंढरीनाथ राणे यांची दुमजली इमारत बेकायदेशीर असल्याची तक्रार त्यांचे भावाने दिली होती. या तक्रारी नुसार शाहनिशा केली असता नगररचना विभागाने राणे यांची इमारत बेकायदेशीर असल्याचे आढळून आले. यानंतर गुरूवारी नगररचनाचे इस्माईल शेख व अतिक्रमण अधिक्षक एच.एम. खान हे अतिक्रमण पथकासह दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास विवेकानंदात दाखल झाले होते. परंतु. यावेळी शरद राणे यांनी घर पाडण्यास विरोध करत अजून दोन दिवसाची मुदत मागितली. पथकाने मुदत देण्यास नकार दिल्याने राणे यांनी घराला कुलूप निघून गेले. मात्र, यावेळी पंचनामाकरून अनाधिकृत घर पाडण्यास सुरवात केली आहे. दरम्यान, राणे यांनी आयुक्तांची भेट घेवून दोन दिवसांची मुदत मागितली असता आयुक्तांनी मुदत वाढवून देण्यास नकार दिला.