जळगावतून मुंबईला अडीच हजारांत हवाई सफर

0

जळगाव। जिल्ह्यात मोठे उद्योग, व्यवसाय, व्यापारी व सोन्याची बाजारपेठ व विमानतळ असूनही कोणतेेही विमान उड्डाण घेत नव्हते मात्र लवकरच जळगाव येथून विमान उड्डाण घेणार व येथे उतरणार आहे. डेक्कन चार्टर कंपनीने तयारी सुरू केली आहे. ही सेवा सप्टेंबर महिन्यापासून जळगाव येथून सुरू होणार सुरुवात 72 आसनी विमानाने होणार असल्याची कंपनीच्या सुत्रांनी माहिती दिली.

ऑगस्टमध्ये शेड्यूलची घोषणा
रेल्वे, महामागर्र्, व्यापारी, उद्योग, एमआयडीसी असून जळगाववरून विमानसेवा नव्हती.ती आता प्रत्यक्षात येणार आहे.पंतप्रधान मोदी यांच्या ‘उडाण’ योजनेंतर्गत राज्यातील प्रवाशी वाहतुकीचा ठेका डेक्कन चार्टर कंपनीला मिळाला आहे. कंपनी आपली सेवा जळगाव येथून सप्टेंबर महिन्यापासून सुरू करणार आहे.ही सेवा सुरू करण्यापुर्वी कंपनी आपले बॅक ऑफिसचे काम पुर्णत्वाकडे नेत आहे. आणखी कोणती सेवा सुरू करता येईल याचाही विचार व पाहणी कंपनी करणार आहे. या विमान सेवेचे शेड्युल ऑगस्ट महिन्यात जाहीर करणार आहे. शेड्युल निश्‍चित नसले तरी जळगावला दिवसातून एकावेळेस विमान ये-जा नक्की करेल.कारण सरकारकडून डेक्कन चार्टर विमान कंपनीला एकावेळेची सबसिडी मिळणार आहे.

वेळ गैरसोयीची: जळगावहून मुुंबईला जाणारे विमान 11.50 आणि दुपारी 1 वाजून 50 मिनिटांनी उड्डाण करणार आहे. हा प्रवास 90 मिनिटांचा असल्याने दुसरे विमान जवळपास 3.30 वाजता मुंबईत पोहचल्यावर फारशी कामे होवू शकणार नाहीत. म्हणून जळगावचे उद्योजक व व्यापारी वेळेबद्दल नाराज राहू शकतात. अगदीच तातडीच्या कामासाठी ते विमानाला महत्व देतील. अन्यथा रेल्वेच्या वेळा त्यांना सोयीच्या वाटतात.