जळगावनजीक अपघात : विटव्यातील प्रौढाचा मृत्यू ; पत्नी गंभीर

Accidental death of Vitva’s son-in-law who was on his way home after his father-in-law’s thirteenth birthday जळगाव : भरधाव दुचाकीने दुसर्‍या दुचाकीला धडक दिल्याने विटनेर येथील इसमाचा मृत्यू झाला तर पत्नी गंभीर जखमी झाली. सासर्‍याचे तेरावे आटोपून घराकडे दाम्पत्य निघाल्यानंतर त्यांच्यावर संकट कोसळले. जळगाव तालुक्यातील आसोदा गावाजवळ घडलेल्या अपघात प्रकरणी शुक्रवारी सायंकाळी जळगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. श्रीकृष्ण दत्तात्रय वाणी (५०, रा.विटनेरख ता.जि. जळगाव) असे मयताचे नाव आहे तर त्यांच्या पत्नी सुरेखा श्रीकृष्ण वाणी या गंभीर जखमी झाल्या आहेत.

भादलीकडे निघाल्यानंतर कु्रर काळाची झडप
जळगाव तालुक्यातील विटनेर येथील रहिवासी श्रीकृष्ण दत्तात्रय वाणी (५०) हे आपल्या पत्नी सुरेखा श्रीकृष्ण वाणी यांच्यासह वास्तव्याला होते. सुरेखा यांचे वडील मयत झाले होते. त्यांच्या तेराव्याच्या कार्यक्रमाला श्रीकृष्ण वाणी हे पत्नी सुरेखा वाणी यांच्यासह भादली येथे कार्यक्रमासाठी दुचाकीने आले होते. शुक्रवार, २ डिसेंबर रोजी दुपारी तेराव्याचा कार्यक्रम आटोपून श्रीकृष्ण वाणी हे पत्नी सुरेखा वाणी यांच्यासह दुचाकीने विटनेरला निघाले असताना दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास पेट्रोल भरून रोडक्रॉस करत असताना भरधाव वेगाने येणार्‍या दुचाकीवरील दोघांनी श्रीकृष्ण वाणी यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत श्रीकृष्ण वाणी यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांची पत्नी सुरेखा वाणी या गंभीर जखमी झाल्या.

जळगाव तालुका पोलिसात गुन्हा
अपघातानंतर जळगाव तालुका पोलिस ठाण्याचे पोलीस कर्मचार्‍यांनी धाव घेऊन मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना केला. यावेळी नातेवाईकांची मोठी गर्दी जमली होती. या संदर्भात जळगाव तालुका पोलिसात अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.