जळगाव- येथे जिल्ह्यातील नागरिकांसाठी पासपोर्ट कार्यालय सुरु व्हावे अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होत होती. जिल्ह्यासाठी पासपोर्ट कार्यालय मंजूरही झाले होते. मात्र प्रत्यक्ष कार्यालय सुरु झाले नव्हते. आज अखेर कार्यालय सुरु झाले असून याचे उद्घाटन करण्यात आले. खासदार ए.टी.पाटील यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन झाले. यावेळी आमदार सुरेश भोळे, जी.प.अध्यक्षा उज्ज्वला पाटील, शिक्षण समिती सभापती पोपट भोळे, पासपोर्ट ऑफिसर स्वाती कुलकर्णी , प्रणव कुमार आदी उपस्थित होते.
आज जळगावला "पासपोर्ट कार्यालय उदघाटन" केले. मा PM @narendramodi जींच्या नेतृत्वात देश प्रगती करीत असल्याचे अजून एक प्रत्यक्ष प्रमाण मा विदेशमंत्री @SushmaSwaraj यांच्या द्वारे जळगाव जिल्ह्याला भेटले. यावेळी आ सुरेश भोळे, RPO स्वाती कुलकर्णी (IFS), PGO प्रणव कुमार व मान्यवर होते. pic.twitter.com/fwr6hooqxt
— A T Nana Patil M P (@atnanapatilmp) May 23, 2018