इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये होणार रॅलीची नोंद
जळगाव : ‘अंगदान महादान’, स्वर्ग मे चाहिये स्थान, तो किजीये अवयवदान अशा विविध घोषणा देत शहरात अवयवदान जनजागृती रॅली काढण्यात आली.
अखिल भारतीय मारवाडी महिला संमेलन, जळगाव शाखेतर्फे युवाशक्ती फौंडेशनच्या सहकार्याने शहरात अवयवदानाचे महत्व सांगणारी जनजागृती रॅली शनिवारी काढण्यात आली. संस्थेतर्फे देशभरातील अनेक शहरांमध्ये देखील रॅली निघाली. त्याचाच भाग म्हणून जळगावातही रॅलीचे आयोजन होते. देशातील सर्व रॅलीची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये केली जाणार आहे.
रॅलीने वेधले लक्ष
रॅलीची सुरुवात भाऊंचे उद्यानपासून करण्यात आली. प्रमुख पाहुणे डॉ.राजेंद्र अग्रवाल, भुसावळ येथील के.नारखेडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रामप्रकाश अग्रवाल, डॉ.शीतल अग्रवाल उपस्थित होते. त्यांचे हस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅलीला सुरुवात झाली. विविध घोषणांसह रॅलीत अवयवदानाचे महत्व सांगणारे घोषवाक्य लिहिलेल्या पाट्यांनी शहराचे लक्ष वेधले. त्यानंतर रॅली सागर पार्क मार्गे काव्यरत्नावली चौकात सांगता झाली.यावेळी मान्यवरांनी, अवयवदानाने अनेकांचे प्राण वाचू शकतात, त्यामुळे देहदान आणि अवयवदान करणे महत्वाचे आहे असे सांगितले.
विद्यार्थ्यांसह सामाजिक संघटनांचा सहभाग
रॅलीत विद्यार्थी, नागरिकांनी, महिला संघटनानी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदविला. रॅलीसाठी मारवाडी महिला संमेलनाच्या प्रांतीय उपाध्यक्ष उषा सिखवाल, अध्यक्षा अंशू अग्रवाल, सचिव पूजा अग्रवाल, संतोष नवाल, सुशीला राठी, ललिता अग्रवाल, सुषमा बाहेती, सुषमा झंवर, भगवती सोनी, रेखा अग्रवाल, किरण स्वर्णकार , लता भारतीया, सुधा खटोड, दीप्ती अग्रवाल यांचेसह युवाशक्ती फाउंडेशनचे सचिव अमित जगताप, संदीप सूर्यवंशी, मनजित जांगीड आदींनी परिश्रम घेतले.