जळगावातील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

जळगाव : जळगाव शहरातील हरीविठ्ठल नगर परीसरातील 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेण्यात आले. या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञाताविरोधात गुन्हा
14 वर्षीय मुलगी ही आपल्या कुटुंबियांसह शहरातील हरीविठ्ठल नगरात वास्तव्याला आहे. सोमवार, 27 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता अल्पवयीन तरुणीने काकांकडे जाते, असे सांगून घराबाहेर पडली मात्र दुपारपर्यंत घरी न आल्याने तिच्या परीवारातील सदस्यांनी शोधाशोध सुरू केली. नातेवाईक व मैत्रिणींकडे शोधाशोध केली तिचा पत्ता लागला न लागल्याने अज्ञातांनी तिला पळवून नेल्याचा संशय कुटुंबियांनी व्यक्त करीत तक्रार दिल्यानंतर मंगळवारी अज्ञात व्यक्तीविरोधात रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. . पुढील तपास महिला पोलिस हेड कॉन्स्टेबल उषा सोनवणे करीत आहे.