जळगाव : शहरातील समता नगर भागातील 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञाताने फूस लावून पळवून नेले. याबाबत रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
फुस लावून पळवून नेल्याचा आरोप
जळगाव शहरातील समता नगर भागात 17 वर्षीय मुलगी ही आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. शुक्रवार, 5 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता मुलगी घरी असताना घरात कोणाला काही न सांगता बाहेर पडली व घरी परतलीच नाही मात्र अज्ञात व्यक्तीने तिला फूस लावून पळवून नेल्याचा आरोप तिच्या नातेवाइकांनी केला आहे. पीडित मुलीच्या नातेवाईकांनी शनिवार, 6 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता रामानंदनगर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिल्याने अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक फौजदार संजय चौधरी करीत आहे.