जळगावातील अवैध वाळू वाहतूक रडारवर : पाच डंपर पोलिसांकडून जप्त

जळगाव : महसूल व पोलिस प्रशासनाच्या छुप्या आशीर्वादाने शहरात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू वाहतूक सुरू असल्याची ओरड होत असतानाच पोलिस प्रशासनाने एकाचवेळी तीन ठिकाणी स्वतंत्र कारवाई करीत पाच डंपर जप्त केले. या प्रकरणी सात जणांविरोधात या प्रकरणी शनीपेठ, जिल्हापेठ आणि रामानंदनगर पोलिसात गुन्हे दाखल केल्याने अवैध वाळू वाहतूकदारांमध्ये खळबळ उडाली.

अवैध वाळू वाहतूकदारांमध्ये खळबळ
जळगाव शहरातील भिलपूरा चौकात डंपर क्रमांक (एम.एच.19 सी.3422) पोलिसांनी जप्त करीत डंपर चालक शेख रहिम शेख रऊफ (31, आव्हाणे, ता.जि.जळगाव) याच्याविरोधात शनीपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आकाशवाणी चौकात शनिवार, 4 जून रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास विना क्रमांकाच्या तीन डंपरमध्ये अवैध वाळू आढळली. हवालदार फिरोज तडवी यांच्या फिर्यादीवरून देविदास नवल रायसिंग (बांभोरी, ता.धरणगाव), प्रमोद भीमराव नन्नवरे (बांभोरी, ता.धरणगाव), सतीष लक्ष्मण महाजन (शनीपेठ), संतोष शालक नन्नवरे (बांभोरी), आणि ज्ञानेश्वर श्रावण नन्नवरे (जळगाव) या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

तिसर्‍या कारवाईत दोघांविरोधात गुन्हा
तिसर्‍या कारवाईत शहरातील शिवकॉलनी स्टॉप जवळील राष्ट्रीय महामार्गावर रामानंदनगर पोलिसांनी डंपर (एम.एच.19 सी.वाय.5915) जप्त केले या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल नितेश बच्छाव यांच्या फिर्यादीवरून सैय्यद अशफाक सैय्यद शफी (आव्हाणे, ता.जि.जळगाव) आणि अभय हरी परदेशी (रा.भडगाव, जि.जळगाव) या दोन्हींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाण पुढील तपास हवालदार विकास महाजन करीत आहे.