जळगाव- शहरातील कवयीत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाजवळील आदिवासी वस्तीगृहात एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेने विद्यार्थ्यांमध्ये थरकाप उडाला आहे तर या विद्यार्थ्याने आत्महत्या केली नसून त्याचा मृत्यू झाला, अशी देखील चर्चा रंगत आहे.