जळगावातील डॉक्टरांकडे लूट ; आरोपींना दोन दिवसांची पोलिस कोठडी

0

जळगाव- जळगावातील रींग रोडवरील डॉ. आचल पाटील यांच्या घरात जबरी लूट केल्याप्रकरणी चेतन भागवत सूर्यवंशी (वय 28, रा. वाघनगर, कोल्हे हिल्स परिसर) व जाकीर पिरन खाटीक (वय 40, रा. बिलाल चौक, तांबापुरा) यांना शनिवारी अटक केल्यानंतर रविवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या गुन्ह्यातील रियाज राजू खाटीक व रमजान रहिम शेख (दोघे रा. धुळे) हे दोन संशयित पसार असून त्यांचा कसून शोध सुरू आहे. कामावरून कमी केल्याचा राग असल्याने चेतन सूर्यवंशी याने गुन्हेगारांची मदत घेत हा गुन्हा केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपींकडून एक लाख 24 हजार 600 रूपये हस्तगत करण्यात आले आहे. तर उर्वरीत रक्कम रीयाज व रमजान यांच्याकडे असल्याची माहिती आरोपींनी पोलिसांना दिली.