जळगावातील तरुणाचा खून : अटकेतील संशयीतांना 30 पर्यंत पोलिस कोठडी

जळगाव : शहरातील पिंप्राळा रेल्वे गेटजवळील मालधक्क्याजवळ जुन्या वादातून अनिकेत गणेश गायकवाड (20, राजमालती नगर, जळगाव) या तरुणाचा मंगळवारी मध्यरात्री चाकूचे वार करून व दगडाने ठेचून निर्घृण खून करण्यात आला होता. या प्रकरणी सागर रामु सामुद्रे (19, राजमालती नगर, जळगाव) आणि सुमित संजय शेजवळ (18, पिंप्राळा) या मयत तरुणाच्या मित्रांना अटक करण्यात आली होती. संशयीतांना गुरुवारी जळगाव न्यायालयात हजर केले असता त्यांना 30 पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

संशयीतांविरोधात खुनाचा गुन्हा
मंगळवार, 24 रोजी मध्यरात्री अनिकेत गणेश गायकवाड (20) या तरुणासोबत त्याचे मित्र सागर व सुमित यांनी पार्टी केली व जुना वाद उकरून निघाल्याने दोघा मित्रांनी अनिकेतवर चाकूचे वार करून तसेच त्याच्या डोक्यात दगड टाकून त्याची हत्या केली होती. याबाबत शहर पोलिस ठाण्यात सुरुवातीला अज्ञातांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल होता. जळगाव गुन्हे शाखेने दोन्ही संशयीतांना मेहरुण तलाव भागातून अटक केल्यानंतर गुरुवारी त्यांना जळगाव जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता 30 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.