जळगाव : शहरातील गोलाणी मार्केटच्या छतावरून पडल्याने तरुणाचा मृत्यू झाला. मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी शहर पोलिसात अकस्तात मृत्यूची नोंद करण्यात आली. मुकेश रमेश राजपूत (32, रा. नाथवाडा, जळगाव) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.
शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
मुकेश राजपूत हा आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास होता शिवाय गोलाणी मार्केट येथील खाऊगल्लीत चायनीज दुकानावर कामास होता. सोमवार, 9 मे रोजी सायंकाळी गोलाणी मार्केट येथील खाऊ गल्लीत कामावर आला होता. रात्री काम आटोपून घरी निघून गेला. दरम्यान, रात्री 12.30 वाजता तो गोलाणी मार्केटच्या छतावरून खाली पडल्याचे त्याचा जागीच मृत्यू झाला. कामावरून घरी गेलेला मुकेश गोलाणी मार्केटमध्ये रात्री उशीरा काय करत होता याची माहिती अद्याप मिळालेली नाही. मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. मंगळवार, 10 मे रोजी सकाळी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.