जळगाव : शहरातील इच्छादेवी चौकातील 32 वर्षीय तरुणाचा मृतदेह मेहरुण तलावात आढळल्याने खळबळ उडाली. ही घटना सोमवार, 8 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यू नोंद करण्यात आली. नाना सुरेश सोनवणे (32, रा.इच्छादेवी नगर) असे मयत तरूणाचे नाव आहे. तरुणाने आत्महत्या केली की त्याचा पाय घसरल्याने ही दुर्घटना घडली याबाबत पोलिस तपास करीत आहेत.
तलावात बुडाल्याने मृत्यू
नाना सुरेश सोनवणे हा सोमवार, 8 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास मेहरण तलाव येथे गेला असता काही वेळेनंतर तो बुडाल्याची माहिती पोलिसांना मिळाल. पोलिसांनी पोहणार्यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रवाना केला. त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ.प्राची सुरतवाला यांनी त्यास मयत घोषित केले. यावेळी नातेवाईकांची मोठी गर्दी झाली तर आप्तेष्टांनी मोठा आक्रोश केला.