जळगाव : शहरातील दाणा बाजारातून तरुणाची 35 हजार रुपये किंमतीची दुचाकी चोरीला गेली. या प्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
दुचाकी चोरींचे सत्र कायम
औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथील संदीप दगडु बादांदडे (28) हा तरुण शनिवार, 9 एप्रिल रोजी जळगाव शहरातील दाणाबाजारात साहित्य खरेदी करण्यासाठी आला होता. यादरम्यान दुपारी दीड वाजेच्या सुमारास त्याने त्याची दुचाकी (एम.एम.20 एफ.आर. 4254 ) या क्रमाकांची दुचाकी दाणाबाजारातच खैरनार ऑप्टीकल्स समोर चिंचेच्या झाडाखाली उभी केली. काम आटोपून दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास परतल्यावर दुचाकी चोरीला गेल्याचे लक्षात आले. अखेर दोन दिवसांनंतर संदीपने जळगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर तक्रारीवरुन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल भास्कर ठाकरे हे करीत आहेत.