जळगाव : भिकमचंद जैन हौसिंग सोसायटीत राहणार्या तरुणाच्या क्रेडीटकार्डवरुन परस्पर व्यवहार करून भामट्याने 24 हजार 702 रूपयांची फसवणूक केली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
परस्पर रक्कम कपात
शहरातील भिकमचंद जैन हौसिंग सोसायटी येथील नितीन मनोज जैन (22) हा तरूण वास्तव्यास असून कोर्ट चौकातील कृषक भवन येथील एमआयच्या मोबाईल स्टोअर दुकानात तो कामाला आहे. त्याच्याकडे आर.बी.एल कंपनीचे क्रेडीट कार्ड असून त्यावर त्यांनी व्यवहार केले आहेत. शनिवार, 18 जून रोजी सायंकाळी 6.52 वाजेच्या सुमारास ते दुकानात असतांना त्यांच्या मोबाईलवर क्रेडीट कार्डवर बिल जनरेट झाल्याचा मॅसेज आला. त्यांनी हा मॅसेज बघितला असता 13 जून रोजी त्यांच्या क्रेडीट कार्डवरुन अज्ञात इसमाने 24 हजार 702 रुपयांची खरेदी केल्याचे त्यांना समजले. त्यांनी बँकेला आपली फसवूणक झाल्याबाबत मेलद्वारे तक्रार केली. यावर बँकेकडून त्यांना पोलिसात तक्रार करण्याबाबत सांगितल्याने त्यांनी शहर पोलिसात रविवार, 19 जून रोजी सायंकाळी धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून शहर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.