जळगाव : आईसक्रीम मागण्याच्या कारणावरून शहरातील तरुणणाला बेदम मारहाण करण्यात आला. ही घटना अजिंठा चौकात शुक्रवार, 22 रोजी घडली. यसा प्रकरणी एमआयडीसी पोलिसात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
आईस्क्रीम मागण्यावरून वाद
गणेश भगवान लोहार (24, राका चौक, एमआयडीसी, जळगाव) हा तरुण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शुक्रवार ,22 एप्रिल रोजी गणेश हा अजिंठा चौकात आईसक्रीम घेण्यासाठी गेला असता दुकानावरील शिवा पुरभीया याला लवकर आईस्क्रीम दे, असे सांगितल्याचा राग आल्याने शिवा पुरभिया, गोविंद शिवा पुरभिया आणि रामुलाल पुरभीया (सर्व रा. अजिंठा चौफुली, जळगाव) यांनी हातात लाकडी दांडा व फायटरने गणेशला बेदम मारहाण केली. या प्रकरणी गणेश लोहार यांनी रविवार, 24 एप्रिल रोजी रात्री संशयीत आरोपी शिवा पुरभिया, गोविंद पुरभिया आणि रामलाल पुरभिया या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला. तपास हवालदार विजय पाटील करीत आहे.