जळगाव : शहरातील एका भागातील 18 वर्षीय तरुणीचा विनयभंग करण्यात आला. याबाबत रामानंदनगर पोलिस ठाण्यात तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
तरुणाविरोधात गुन्हा दाखल
जळगाव शहरातील एका भागात राहणारी 18 वर्षीय तरुणी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शनिवार, 18 जून रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास सैय्यद अकबर सैय्यद सलाउद्दिन याने तरूणीकडे पाहून डोळा मारला. त्यानंतर तिचा हात पकडून तिच्याशी अश्लिल वक्तव्य करून तिचा विनयभंग केला. हा प्रकार तरूणीने नातेवाईकांना सांगितला. पीडीत तरूणीने रामानंदनगर पोलिस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्याने संशयीत आरोपी सैय्यद अकबर सैय्यद सलाउद्दिन याच्याविरोधात रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक रोहिदास गभाले करीत आहे.