जळगावातील तरुणीची ऑनलाईन मोबाईलद्वारे साडेपाच लाखांत फसवणूक

A girl in Jalgaon was cheated of five and a half lakhs through online mobile phone जळगाव : पीएचडी फी भरण्याच्या नावाखाली ऑनलाईनरीत्या तरुणीची साडेपाच लाखात फसवणूक झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी या प्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

ऑनलाईन केली फसवणूक
जळगाव शहरातील अयोध्या नगरातील रहिवासी असलेली एका 29 वर्षीय तरुणीला 9 व 10 नोव्हेंबर रोजी तिच्या मोबाईलवर अनोळखी इसमाने व्हॉटसअ‍ॅपवर संदेश पाठवीत एका महाविद्यालयात पीएचडीची फी भरण्यास सांगितले. यानंतर त्यांच्याकडून परवानगीशिवाय इंटरनेट बँकिगचे आयडी व पासवर्ड घेत बँकेतून गुप्तपणे चार लाख 79 हजार तर त्यांच्याकडून युपीआयहून 61 हजार लांबविले. यानंतर फसवणूक झालेल्या तरुणीने तत्त्काळ सायबर पोलिसात धाव घेत अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलिस निरीक्षक लिलाधर कानडे करीत आहेत.