Jalgaon Shaken : A 22-year-old girl was tortured with a knife on her neck जळगाव : शहरातील एका भागातील 22 वर्षीय तरुणीवर चाकूचा धाक दाखवून अत्याचार करण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी एकाविरोधात शनीपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
मानेला चाकू लावून अत्याचार
जळगाव शहरातील शनिपेठ हद्दीत 22 वर्षीय तरुणी ही आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्यास असून गुरुवार, 1 सप्टेंबर रोजी रात्री 11 ते 12 वाजेच्या दरम्यान संशयीत आरोपी विनोद सुकलाल भोळे याने तरुणीच्या घरात येऊन तिच्या मानेला चाकू लावत तिला ओढत नेत घरात मागे असलेल्या नाल्यात घेवून गेला. त्यानंतर पुन्हा घरात आणून तिच्या हाताच्या बोटावर चाकूने जखमी करीत तसेच तरुणीला खाटेवर ढकलून देत तिच्यावर जबरदस्ती अत्याचार करण्यात आला.
आरोपीविरोधात गुन्हा दाखल
या संदर्भात तरुणीने शनीपेठ पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. तरूणीच्या तक्रारीवरून मंगळवार, 6 सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता शनिपेठ पोलिस ठाण्यात संशयीत आरोपी विनोद सुकलाल भोळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.