जळगावातील दैनिक जनशक्तीच्या कार्यालयाचे मंत्री मुंडे यांच्याहस्ते थाटात उद्घाटन

मंत्री धनंजय मुंडे यांनी जनशक्ती वृत्तपत्राचे केले वाचन : महापौर जयश्री महाजन, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, रवींद्रभैय्या पाटील यांची उपस्थिती

जळगाव : शहरातील चित्रा चौकातील ‘दैनिक जनशक्ती’च्या नूतन कार्यालयाचे शनिवार, 7 रोजी सायंकाळी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनजंय मुंडे यांच्याहस्ते फित कापून मोठ्या थाटात उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजी पालकमंत्री तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर, मनपा महापौर जयश्री महाजन, रवींद्र भैय्या पाटील, मुख्य संपादक यतीनदादा ढाके आदीसह अनेक मान्यवरांनी भेटी देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

दैनिक जनशक्तीची ऑनलाईनमध्ये भरारी
दैथनिक जनशक्तीने जळगावात ऑनलाईन बातम्यांचे (ई पेपर) पेज सुरू केले असून त्यातूनच जनशक्तीची एक वेगळी ओळखही निर्माण झाली. त्यातूनच वाचकांच्या मनात घर करणारे वृत्तपत्र म्हणून आज दैथनक जनशक्तीची नावारुपाला आले आहे. हे फक्त स्व.कुंदनदादा ढाके यांच्या अथक परीश्रम व दृरदृष्टीमुळेच शक्य झाले. त्यातच त्याचे बंधू यतीनदादा यांनी त्यांच्या पश्चात ‘दैनिक जनशक्ती’ची यशस्वी धुरा सांभाळली ही बाब वाखाण्याजोगी आहे. बदलत्या काळाती सुसंगत होत आज जनशक्तीने ऑनलाईन बातम्यांमध्येही आपले स्थान टिकवून ठेवले आहे. ही बाब साधीसुधी नसल्याचेही त्यांनी सांगितले.

रेडी टू- स्टार्टअप पुस्तक मंत्री मुंडे यांना भेट
दैनिक जनशक्तीचे निवासी संपादक डॉ.युवराज परदेशी लिखित रेडी -टू-स्टार्ट अप पुस्तक राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनजंय मुंडे साहेब यांना सप्रेम भेट देण्यात आले. यावेळी डॉ. युवराज परदेशी यांनी रेडी टू स्टार्टअपविषयी थोडक्यात माहिती सांगितली. यावेळी दैनिक जनशक्ती नुतन कार्यालयाच्या उद्घाटनावेळी जळगाव शहर निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड, सहाय्यक निरीक्षक संदीप परदेशी व सहकार्‍यांनी चोख बंदोबस्त राखला. यावेळी अनेक मान्यवरांनी भेट देऊन जनशक्तीच्या कार्याचे कौतुक केले.

रांगोळ्यांनी वेधले लक्ष

मुंडे यांच्याहस्ते नुतन कार्यालयाच्या उद्घाटनावेळी सुरेख रांगोळी काढण्यात आली होती. यावेळी मान्यवरांचे लक्ष रांगोळीने वेधले. माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर म्हणाले की, जनशक्तीने नेहमीच सर्वसमतोल राखत सध्याच्या युगातही आपली चांगली बातमीदारी केली असून वृत्तपत्रामध्ये आपले एक वेगळे स्थान टिकवून ठेवले आहे.