Adavad Accidant चोपडा : जळगावातील दोघांचा मित्रांचा चोपडा तालुक्यातील अडावद गावाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेने मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी सायंकाळच्या सुमारास घडला. ईश्वर सुदाम सुरळकर (35, रा.रामेश्वर कॉलनी, जळगाव) व योगेश सुकलाल भावसार (34, रा.जगवाणी नगर, जळगाव) अशी मयतांची नावे आहेत.
अज्ञात वाहनाच्या धडकेने दोघा मित्रांचा मृत्यू
अडावद गावाजवळ गुरूवारी सायंकाळी ईश्वर सुदाम सुरळकर (Ishwar Sudam Suralkar) व योगेश सुकलाल भावसार (Yogesh Suklal Bhavsar) हे दोन्ही मित्र दुचाकी (क्र.एम.एच.19-डी.एच. 9769) ने चोपडा येथून जळगावकडे येण्यासाठी निघाले असतानाच त्यांच्या गाडीला देशमुख विद्यालयाच्या जवळ एका अज्ञात वाहनाने उडविल्यानेे ईश्वर सुरळकर हा युवक जागीच ठार झाला तर योगेश भावसार (34, रा.जगवाणीनगर, जळगाव) हा गंभीर जखमी झाल्याने त्यास जळगाव जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले मात्र काही वेळेतच त्याचीही प्राणज्योत मालवली.