जळगाव : दोन अल्पवयीन मुलींना अज्ञातांनी फूस लावून पळवून नेले. याबाबत दोन वेगवेगळे गुन्हे रामानंद नगर पोलिसात दाखल करण्यात आले आहेत.
रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
पहिल्या फिर्यादीनुसार, 17 वर्षीय मुलगी रावेर तालुक्यातील रहिवाशी असून ती जळगाव येथे नातेवाईकांकडे राहण्यासाठी आली असता रविवार, 17 एप्रिल रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले. मैत्रीण व नातेवाईकांकडे शोध घेवून माहिती न मिळाल्याने मुलीच्या वडीलांनी मंगळवार, 19 एप्रिल रोजी रामानंदनगर पोलिस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्याने अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास महिला पोलिस कॉन्स्टेबल उषा सोनवणे करीत आहे.
17 वर्षीय मुलीस पळवले
दुसर्या घटनेत, 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी ही कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. मंगळवार, 19 एप्रिल रोजी दुपार चार वाजता अज्ञात व्यक्तीने मुलगी घरी असतांना फूस लावून पळवून नेले. मुलीच्या पालकांनी तिचा शोधाशोध केली परंतू कुठेही आढळून न आल्याने पालकांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार सुनील पाटील करीत आहे.