शनिपेठ पोलीस ठाण्यात तरुणाविरोधात अपहरणाचा गुन्हा
जळगाव- गेल्या काही दिवसांपासून शनिपेठ परिसरातून अल्पवयीन मुलगी व तरुण रफूचक्कर झाले होते. या प्रेमीयुगलाला पुणे रेल्वे स्थानकावर पोलिसांनी ताब्यात घेवून शनिपेठ पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. विशेष म्हणजे या दोघा प्रेमीयुगलाबाबत त्याच्या कुटुंबियांनाही कुठलीहीच माहिती नव्हती. शनिवारी शनिपेठ पोलीस ठाणे गाठल्यावर कुटुंबियांना माहिती देण्यात आली. यानंतर कुटुंबियांना हा प्रकार कळाला.
शनिपेठ परिसरातील वाल्मिक नगर येथील शुभम शरद बाविस्कर या तरुणाने प्रेमप्रकरणातून 12 रोजी अल्पवयीन मुलीला जळगावतून पळवून गेले. पळून गेल्यानंतर दोघे पुणे रेल्वेस्थानकावर फिरत असतांना तेथील लोहमार्ग पोलिसांना संशय आला. त्यांनी दोघांची विचारपूस तसेच चौकशी केल्यावर दोघेही घरुन पळून आल्याचे पोलिसांना समजले. अनुचित प्रकार घडू नये म्हणून तेथील पोलिसांनी शनिपेठ पोलिसांना फोन वरुन प्रेमीयुगल असल्याची माहिती दिली. त्यानुसार शनिपेठ पोलीस ठाण्याचे कर्मचार्यांनी पुणे गाठून दोघांना ताब्यात घेतले. सोमवारी पथकाने दोघांना सोबत घेवून शनिपेठ पोलीस ठाणे गाठले. घटनेची माहिती मिळाल्यावर दोघांच्या कुटुंबियांना पाचारण करण्यात आले. शनिपेठ पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरिक्षकांसह पोलीस निरिक्षकांनी अल्पवयीन मुलीची तसेच तरुणाची स्वतंत्रपणे चौकशी करुन माहिती जाणून घेतली. याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या आईच्या फिर्यादीवरुन शनिपेठ पोलीस ठाण्यात शुभम बाविस्कर विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.