A cloth shop in Baliram Peth in Jalgaon was broken into and a cash of one and a half lakhs was recovered जळगाव : कापड दुकानातून चोरट्यांनी एक लाख 45 हजारांची रोकड लांबवल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणी शहर पोलिसात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
बंद दुकानांना टार्गेट
राजा दयालदास पारवाणी (54, रा.सिंधी कॉलनी, कंवर नगर, जळगाव) हे आपल्या परीवारासह वास्तव्याला आहे. त्यांचे जळगाव शहरातील बळीराम पेठेतील संत कंवरराम मार्केटमध्ये न्यू गोवर्धन कलेक्शन कापड नावाचे दुकान आहे. रविवार, 18 डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजता दुकान बंद करून राजा पारवाणी हे घरी गेले. दरम्यान मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी कापड दुकानाचे शटर उचकावून दुकानातील गल्ल्याचे लॉक तोडून एक लाख 45 हजार रुपयांची रोकड चोरून नेण्याचे उघडकीला आले.
अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा
सोमवार, 19 डिसेंबर रोजी नेहमीप्रमाणे 9.30 वाजता एका चहा टपरीवाल्याला चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने राजा पारवानी यांना फोन करून घटनेची माहिती दिली. पारवाणी हे त्वरीत त्यांच्या दुकानावर आले. त्यानंतर शहर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिल्याने अज्ञात चोरट्यांविरोधात दुपारी चार वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.