Obscene messages sent to a famous female doctor in Jalgaon जळगाव : सोशल मिडीयातील व्हाट्सअॅपद्वारे एकाने जळगाव शहरातील प्रसिद्ध महिला डॉक्टरास अश्लील संदेश पाठवल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणी रविवार, 11 सप्टेंबर रोजी जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
सायबर पोलिसात गुन्हा
जळगाव शहरातील एका हॉस्पिटलमधील महिला डॉक्टरांच्या व्हॉट्सअॅपवर अज्ञात व्यक्ती गेल्या 27 ऑगस्टपासून 2022 पासून अश्लील संदेश पाठवून तसेच व्हाईस कॉलिंग करीत घाणेरड्या भाषेत बोलत होता. 8788658276 या अनोळखी क्रमाकांहून अज्ञात व्यक्ती महिला डॉक्टरला त्रास दिला जात होता. या त्रासाला कंटाळून महिला डॉक्टरने संबधित प्रकाराबाबत जळगाव सायबर पोलिसात तक्रार दिल्यानंतर रविवार, 11 सप्टेंबर रोजी जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक लिलाधर कानडे करीत आहेत.