भुसावळ- बेलविक्रीचा व्यवसाय करणारी जळगावच्या शिरसोली प्र.बो.तील 50 वर्षीय महिला भुसावळातून बेपत्ता झाल्याने भुसावळ बाजारपेठ पोलिसात हरवल्याची नोंद करण्यात आली. अंजनाबाई भिका सावळे (50) असे हरवलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी सावळे यांचा मुलगा शशीकांत भिवा सावळे याने भुसावळ बाजारपेठ पोलिसात हरवल्याची खबर दिली. अंजनाबाई या मैत्रीणीसोबत बेल विक्रीसाठी 20 रोजी भुसावळहून रेल्वेने नाशिक गेल्या मात्र 21 रोजी परत आल्याच नाहीत. तपास हवालदार माणिक सपकाळे करीत आहेत.