जळगावातील महिलेचा मेहरुण तलावात आढळला मृतदेह

The dead body of a woman in Jalgaon was found in Mehrun Lake जळगाव : शहरातील मेहरूण तलावात आदर्श नगरातील रहिवासी असलेल्या 68 वर्षीय सुमती रमेश श्रीखंडे यांचा मृतदेह आढळला आहे. गुरूवारी सकाळी 10 वाजता ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

मृत्यूचे कारण अस्पष्ट
सुमती सूर्यवंशी या वयोवृध्द महिला आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास होत्या. गुरुवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास शहरातील मेहरूण तलावातील गणेश घाटजवळ त्यांचा मयत स्थितीत मृतदेह आढळून आला. त्यांनी आत्महत्या केली किंवा पाण्यात पडून त्यांचा मृत्यू झालायाबाबत स्पष्ट माहिती कळू शकली नाही. एमआयडीसी पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, मुलगी असा परीवार आहे.