A 50-year-old woman was molested by the accused after entering her house जळगाव : 50 वर्षीय महिला कपडे बदलवत असताना संशयीत आरोपीने अनधिकृतपणे घरात प्रवेश करीत महिलेचा विनयभंग केला. या प्रकरणी रविवार, 11 सप्टेंबर रोजी एकाविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
अश्लीलपणे साधला संवाद
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील एका परीसरात राहणारी 50 वर्षीय महिला गुरुवार, 1 सप्टेंबर रोजी दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास नळाचे पाणी भरल्यानंतर घरामध्ये कपडे बदलवत असताना संशयीत राजकुमार मिश्रा याने घरात अनधिकृत प्रवेश करीत महिलेसोबत अश्लिल संवाद साधला तसेच पीडीत महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. याप्रकरणी पीडीत महिलेच्या फिर्यादीवरून रविवारी शहर पोलिसात राजकुमार मिश्रा याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक फौजदार संगीता खांडरे करीत आहेत.