जळगावातील मुक्ताईनगर कॉलनीतून दुचाकी लांबवली

जळगाव : शहरातील मुक्ताईनगर कॉलनी परीसरातून एकाची मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

शहरात दुचाकी चोरट्यांची टोळी सक्रिय
मुक्ताईनगर कॉलनीतील रहिवासी राजेंद्रकुमार रामकिसन सोनवणे (54) यांनी नेहमीप्रमाणे त्यांची (एम.एच.19 के 0641) या क्रमांकाची दुचाकी घराच्या कंपाउंडमध्ये उभी केली मात्र 7 फेब्रुवारी रोजी सकाळी 6.30 वाजेच्या सुमारास घरासमोर उभी दुचाकी दिसून आली नाही. दोन दिवस सर्वत्र शोध घेतला मात्र त्यानंतरही दुचाकी मिळून न आल्याने चोरीची खात्री झाल्यावर अखेर सोनवणेंनी जिल्हा पेठ पोलिसात तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस नाईक प्रदीप पाटील करीत आहेत.