जळगावातील राज वाईन शॉपमधून मुदत संपलेल्या बिअर जप्त

Sale Of Expired Beer in Jalgaon : 124 bottles Seized From Raj Wine जळगाव : मुदत संपलेल्या (एक्पायरी डेट) बिअरच जळगाव शहरातील अशोक किराणा परीसरातील राज वाईन शॉपमध्ये विक्री होत असल्याची माहिती राज्य उत्पादन विभागाला मिळताच पथकाने छापा मारला. मुदतबाह्य 124 बिअर बॉटल्स आणि बिअरच्या 210 टीन डबे पथकाने जप्त केल्याने मद्य शौकीनांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

तक्रारीची गांभीर्याने दखल
जळगावात तरुणाने या राज वाईनमधून बिअरची बाटली विकत घेतल्यानंतर बिअरची बाटली मुदतबाह्य झालेली होती. त्याने तक्रार केल्यानंतर विभागाच्या पथकातील सी.एच. पाटील, आनंदा पाटील, कर्मचारी दिनेश पाटील, धनसिंग पावरा, सत्यम माळी आणि मनोज मोहिती यांच्या पथकाने दुकानाची झाडाझडती घेतली. त्यात त्यांना अमस्टल बिअरच्या 124 बाटल्या आणि 500 एम.एल.चे 210 टीन मुदतबाह्य असल्याचे आढळून आले.

जिल्हाधिकार्‍यांकडून होणार कारवाई
भरारी पथकाने पंचनामा करत या बाटल्या जप्त केल्या तसेच पुढील कारवाईसाठी जिल्हाधिकारींकडे आरोपपत्र पाठवणार असल्याची माहिती सी.एच. पाटील यांनी दिली.