जळगाव ; वीटभट्टी व्यवसायासाठी आवश्यक असलेला कुंभार असल्याचा व वीटभट्टी व्यावसायीक असल्याचा दाखला देण्यासाठी एक हजार 800 रुपयांची लाच घेताना जळगाव शहरचे तलाठी फिरोज खान अय्युब खान (40, रजा कॉलनी, जळगाव) यास सायंकाळी पाच वाजेच्या रंगेहाथ पकडण्यात आले. जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक गोपाळ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.