वेतन निश्चिती प्रकरणाची सकारात्मक टिपणीसाठी स्वीकारली दोन हजारांची लाच
जळगाव- वेतन निश्चिती प्रकरणाची सकारात्मक टिपणीसाठी लिहिण्यासाठी दोन हजारांची लाच मागणार्या जळगाव सहसंचालक उच्च शिक्षण विभागातील मुख्य लिपिक अजित रामदास सालकर (52, बिल्डिंग नंबर चार शासकीय निवासस्थान, सागर पार्कजवळ, जळगाव) यास जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी दुपारी रंगेहाथ कार्यालयातच अटक केली.
कार्यालयात आरोपीने स्वीकारली लाच
भुसावळ येथील 35 वर्षीय तक्रारदाराची पदोन्नती झाल्यानंतर सुधारीत वेतननिश्चीती प्रकरणाची टिपणी सकारात्मक लिहण्यासाठी व हे प्रकरणी पुढे पाठवण्यासाठी आरोपी अजित सालकरने लाचेची मागणी केली हेाती. 13 जून रोजी या मागणीची एसीबीने पडताळणी केली. 27 रोजी आरोपीने जिल्हाधिकारी कार्यालयामागील शिक्षण विभागाच्या कार्यालयातच लाच देण्यासाठी तक्रारदाराला बोलावल्यानंतर सापळा रचण्यात आला. जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक गोपाळ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार्यांनी सापळा यशस्वी केला.