जळगावातील विवाहितेच्या मोबाईलवर पाठवले अश्लील फोटोसह व्हिडिओ

जळगाव : जळगावातील विवाहितेच्या मोबाईल क्रमांकावर अनोळखीने अश्लिल व्हिडीओसह फोटो पाठवले शिवाय व्हाईस मेसेजसह ओळखीच्या व्यक्तीसोबतचा फोटोदेखील पाठवल्याची धक्कादायक बाब उघड झाली असून या प्रकरणी अनोळखी विरोधात जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

अनोळखी आरोपीचा सायबर पोलिसांकडून शोध
जळगाव शहरातील एका भागातील रहिवासी महिलेला एका अनोळखी व्यक्तीने 15 जुलै रोजी अश्लील फोटो, अश्लिल व्हिडीओ तसेच व्हॉईज मेसेसेज व रेकॉर्डींग पाठविल्याले. महिलेच्या ओळखीच्या व्यक्तीसोबत महिलेचा फोटो शेअर करुन महिलेची बदनामी व्हावी, असेदेखील कृत्य केल्याची बाब उघड झाली असून या प्रकरणी महिलेचने शनिवार, 23 जुलै रोजी जळगाव सायबर पोलिसात तक्रार दिल्यानंतर अनोळखी व्यक्तीविरुध्द विनयभंगांचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक लिलाधर कानडे करीत आहेत.