जळगावातील वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थ्यांची रॅगिंग ; तीन विद्यार्थ्याची महाविद्यालयातून हकालपट्टी
परभणीच्या विद्यार्थ्यांला मारहाण करत केली शिवीगाळ ; राष्ट्रीय अॅन्टी रॅगिंग समितीकडून तक्रारीची दखल
जळगाव- शहरातील शिरसोली-जळगाव रस्त्यावरील इकरा युनानी वैद्यकीय महाविद्यालयात शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुदतसर मुक्तार इनामदार वय 19 रा. परभणी या विद्यार्थ्यांसह 28 विद्यार्थ्यांना शिवीगाळ, मारहाण करत रॅगिंग केल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी रात्री 11.30 वाजता घडला. दरम्यान विद्यार्थ्यांच्या पालकांंनी दिल्ली येथील अँन्टी रॅगिंग समितीला तक्रारीचा मेल करताच समितीकडून त्याची दखल घेण्यात आली. तसेच त्याच्या सुचनेनुसार इकरा महाविद्यालयाकडून रॅगींग करणार्या तिघा विद्यार्थ्यांची हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष करीम सालार यांनी दिली. रॅगींगदरम्यान हिसकावलेले 18 हजार रुपये मोबाईलची फोडल्याप्रकरणी पालकांनी तक्रारीसाठी एमआयडीसी पोलिसात धाव घेतली होती.
एका खोलीत डांबून विद्यार्थ्यांची रॅगिंग
मुदतसर या विद्यार्थ्याने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री वसतीगृहातील 28 मुलांना एका खोलीत डांबण्यात येवून कुलूप लावून घेण्यात आले. याठिकाणी प्रत्येकानेक आपआपली ओळख करुन द्यावी, असे सांगण्यात आले. इतरांप्रमाणे मुदतसर याने नकार देताच मुदतसर याला शिवीगाळ तसेच मारहाण करण्यात आली. यानंतर ट्युब लाईट फूकून विझवून दाखव नाहीतर हिच ट्युट लाईट तुझ्या अंगावर फोडू व मारहाण करुन अशी धमकी दिली. संबंधितांनी मोबाईल फोडून टाकला तसेच खिशातील पाकिटात असलेल्या 17 ते 18 हजार रुपये काढून घेतले. अशा प्रकारे शारीरिक व मानसिक त्रासामुळे मुदतसर हा रॅगिंग करणार्यांच्या तावडीतून सुटून बाहेर आला. व त्याने याप्रकाराबाबत सर्वप्रथम मोबाईलवरुन त्याचे वडीलांना माहिती दिली. इतर मुलांना गर्लफ्रेड बॉयफ्रेड बनून त्याची अॅक्टींग करण्यासह सांगण्यात आल्याचे मुदतसर याने सांगितले.