जळगाव : सर्व शासकीय कार्यालयांमध्येही कॅशलेस व्यवहार व्हावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेतला. या आढाव्याच्या पार्श्वभूमीवर जळगावातील शासकीय कार्यालयामध्ये कॅशलेससाठी हालचाली सुरू झाल्या आहे. महापालिका यंत्रणा सुरू झाल्यानंतर रोख रक्कम स्वीकारणार नाही अशी माहिती देण्यात आली. यासह अधिकार्यांना राष्ट्रीयकृत बँकेच्या अधिकार्यांमार्फत कॅशलेश प्रणालीचे धडे देण्यात आले.
मनपा घेणार तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन
मनपातील सर्व विभागातील कर्मचार्यांना दोन दिवसात तांत्रिक तंत्रज्ञाच्या मदतीने कॅशलेश प्रणाली हाताळण्यासंदर्भात प्रशिक्षण देण्यात येणार असून कॅशलेशच्या अमंलबजावणीवर भर देण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त जीवन सोनवणे यांनी दिली. कॅशलेश व्यवहार करण्यावर विशेष भर देत जळगाव मनपाने कोठेही रोख रक्कम स्वीकार नसल्याचे जारी केले आहे. मनपातील विविध कराचा भरणा हे रोखीने न होता कॅशलेश प्रणाली किंवा चेकद्वारे मनपा खात्यात जमा करावे लागणार आहे. मनपातील एलबीडी विभागात अगोदरच कर भरणा फक्त चेकद्वारे होत आहे.
जि.प. कर्मचार्यांना डेमा
ग्रामीण स्तरावरील सर्व कामे हे जिल्हा परिषदेमार्फत होत असल्याने आणि ग्रामीण भागात कॅशलेश प्रणाली अधिकाधिक पोहचविण्याचे शासनाचे मानस असल्याने बँकेच्या अधिकार्यांनी जिल्हा परिषदेत प्रत्यक्ष जाऊन तेथील अधिकार्यांना कॅशलेश प्रणाली हाताळण्याचे डेमो करुन दाखविले. तसेच कॅशलेश प्रणालीसाठी आवश्यक मुलभुत घटकांबाबात माहिती दिली.