जळगावातील शिवाजीनगरातून चक्क….19 कबुतरांची केली चोरी

0

जळगाव- शिवाजीनगर परिसरातील शिस्तीया पार्कमधील शेख नसीर शेख बुढन यांच्या घराच्या दुसर्‍या मजल्यावरील खोलीतून 19 कबुतरांसह टेबल फॅ न व किरकोळ ऐवज चोरून नेल्याची घटना शुक्रवारी सकाळी 7 वाजेच्या सुमारास उघडकीस आली़ याप्रकरणी शेख नसीर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

शिस्तीया पार्क येथे शेख नसीर शेख बुढन हे कुटूंबीयांसह वास्तव्यास आहे़ त्यांची दुमजी इमारत असून दुसर्‍या मजल्यावरील इमारतीवर त्यांनी पाळीव 19 कबुतर व घरातील काही साहित्य ठेवलेले होते़ दरम्यान, गुरूवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी बनावट चावीच्या सहाय्याने शेख नसीन यांच्या घराच्या दुसर्‍या मजल्यावरील खोलीचा कुलुप उघडून 15 हजार रूपये किंमतीचे 19 कबुतर 1 हजार 700 रूपयांचा टेबल फॅ न व किरकोळ साहित्य चोरून नेले़ चोरीची खात्री झाल्यावर शेख नसीर यांनी तक्रारीसाठी शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यावरुन अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.