रेल्वे प्रशासनातर्फे वीज तारा काढल्या जाणार : सायंकाळनंतर मार्ग होणार खुला
भुसावळ- जळगाव शहरातील शिवाजी नगर रस्त्यावरील पुलाच्या दोन्ही बाजूची वाहतूक शनिवार, 25 रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच दरम्यान थांबवली जाणार आहे. रेल्वे प्रशासनातर्फे या भागातील एच.टी., एल.टी. लाईन (वीज तारा) काढण्याचे काम या वेळेत केले जाणार असून वाहनधारकांनी गैरसोयीबाबत नोंद घ्यावी, असे आवाहन भुसावळ रेल्वे प्रशासनाने केले आहे. या काळात रेल्वे ओव्हरब्रिज पुलाचेदेखील काम केले जाणार असून सायंकाळी पाच वाजेनंतर वाहतूक खुली केली जाणार आहे.