जळगाव : शहरापासून जवळ असलेल्या सातपुडा ऑटोमोबाइल्स या शोरूमच्या मागील बाजूस जुन्या वाहनांना अचानक आग लागल्याची घटना बुधवारी घडली. या आगीत दोन वाहनांचे नुकसान झाले.
आगीचे ठोस कारण अस्पष्ट
जळगाव तालुक्यातील नशिराबाद शिवारात चारचाकी वाहनांचे सातपुडा ऑटोमोबाईल शोरूम आहे. शोरूमच्या मागील बाजूच्या परीसरात जुने भंगार वाहने लावण्यात आली आहे. या वाहनांमधील एका वाहनाला बुधवारख 9 फेब्रुवारी रोजी अचानक आग लागली. शोरूममधील कर्मचार्यांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी शोरूममधील फायर एक्स्टिग्युशरचा वापर करत आग विझवण्याचा प्रयत्न केला तसेच अग्निशमन विभागाला घटनेची माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार अग्निशमन विभागाचे दोन बंब घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन विभागाचे कर्मचारी- रोहिदास चौधरी, भगवान पाटील, संतोष तायडे, ईश्वर पाटील, तेजस जोशी,नितीन बारी यांनी नियंत्रण मिळवत आग विझवली. आगीत दोन जुन्या वाहनांचे नुकसान झाले. वेळीच अग्निशमन बंब पोहोचल्याने नुकसान टळले. नाहीतर या ठिकाणच्या इतरही जुन्या वाहनांना आग लागून ती वाहने खाक झाली असती. जुन्या वाहनातील कॉम्प्रेसरचा स्फोट झाल्यामुळे ही आग लागल्याची शक्यता कर्मचार्यांनी व्यक्त केली आहे.