जळगावातील सिंधी कॉलनीत बंद घर फोडून दुचाकीसह मुद्देमाल चोरीला

जळगाव : शहरातील सिंधी कॉलनीतील बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी दुचाकीसह पाणीपुरीची गाडी आणि गॅस सिलेंडर लांबवले. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

बंद घर चोरट्यांना पर्वणी
हिंमतसिंग जगतसिंग (25, कला भवन, सिंधी कॉलनी) हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. पाणीपुरीचा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतात. 13 मे रोजी सायंकाळी 4 ते 28 मे सायंकाळी 4 वाजेच्या दरम्यान घर बंद करून ते गावाला गेले असता संधीचा फायदा घेवून अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून घरातील दुचाकीसह पाणीपुरीची गाडी आणि गॅस सिलेंडर लांबवले. हिंमतसिंग जगतसिंग हे घरी आल्यावर हा प्रकार लक्षात आला. शुक्रवार, 10 जून रोजी त्यांनी जिल्हापेठ पोलिस तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार महेंद्र पाटील करीत आहे.