जळगावातील सिद्धार्थ नगरात तरुणाची आत्महत्या

A young man commits suicide in Jalgaon when his wife leaves home जळगाव : शहरातील सिद्धार्थ नगर, रामेश्वर कॉलनी भागातील विजय यशवंत अटकाळे (28) या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. बुधवारी मध्यरात्री ही घटना घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

मध्यरात्री घेतला गळफास
विजय अटकाळे हा तरुण पत्नी व मुलासह रामेश्वर कॉलनीतील सिध्दार्थ नगरात वास्तव्याला होता. विजया यांच्या पत्नी माहेरी गेल्या असल्याने ते घरी एकटेच होते. मंगळवार, 6 सप्टेंबर रोजी रात्री गल्लीतील नातेवाईकांशी गप्पा मारून रात्री घरी गेले. मध्यरात्री विजयने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याचे बुधवार, 7 सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आले. या संदर्भात शेजारी राहणार्‍यांनी एमआयडीसी पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला व मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना केला. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयताच्या पश्चात वडील यशवंत गोविंद अटकाळे, आई शिला, भाऊ राकेश, दोन विवाहित बहिणी, पत्नी गीता व मुलगा परीष असा परीवार आहे.