जळगाव : शहरातील हनुमान नगरातील घरासमोरून दोन लाख रूपये किंमतीची बुलेट अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुचाकी चोरट्यांची टोळी शहरात सक्रिय
शहरातील हनुमान नगर येथे सिध्दीविनायक शाळेजवळ राजेंद्र नवल पाटील (34) हे वास्तव्यास आहेत. रविवार, 14 नोव्हेंबर रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे राजेंद्र पाटील यांनी त्यांची (एम.एच.19 सी.एच.1101) या क्रमांकाची बुलेट उभी केली होती. दुसर्या दिवशी सकाळी 15 नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास राजेंद्र पाटील हे कामानिमित्ताने बाहेर जाण्यासाठी निघाले असता, त्यांना घरासमोर उभी त्यांची बुलेट दिसून आली नाही परीसरात तसेच इतरत्र सर्वत्र शोध घेवूनही दुचाकी मिळून न आल्याने राजेंद्र पाटील यांनी याबाबत मंगळवारी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरुन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक मिलिंद सोनवणे करीत आहेत.