जळगावातील 14 गुन्हेगारांची टोळी एका वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार

0

जळगाव: जळगाव शहरात विविध पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर गुन्हे दाखल असलेल्या 14 जणांच्या टोळीला पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. याबाबतचे आदेश त्यांनी नुकतेच पारीत केले आहे.

विविध पोलीस ठाण्यात गंभीर प्रकारचे गुन्हे
जळगाव जिल्ह्यातील जळगाव शहरात एमआयडीसी, जळगाव शहर व शनिपेट या पोलीस स्टेशनच्या हद्दीत व परीसरात खुनाचा प्रयत्न करणे, जबरी चोरी करणे रस्ता आडवणे, बेकायदेशीर रित्या घरात प्रवेश करणे, गैरकायद्याची मंडळी जमवुन दंगा करणे, शस्त्र बाळगुन दुखापतो करणे, शिवीगाळ करणे, दमदाटी करणे या सदराखाली खालील प्रमाणे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत. याबाबत शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक यांनी संबंधितांच्या हद्दपारीचा प्रस्ताव पाठविला होता. त्यानुसार डॉ. पंजाबराव उगले यांनी ही कारवाई केली आहे.

या टोळीप्रमुखासह 14 जण हद्दपार
निलेश उर्फ लोमेश युवराज सपकाळे रा.आसोदा रोड जैनाबाद जळगाव – टोळीप्रमुख , रुपेश मनोहर सोनार रा. मोहन टॉकीज जवळ जळगाव – टोळीसदस्य, मुन्ना उर्फ रतिलाल संतोष सोनवणे रा जेनाबाद जळगाव – टोळीसदस्य, युवराज नामदेव सपकाळे रा जैनाबाद जळगाव – टोळीसदस्य, शामकांत आनंदा कोळी रा हरीओमनगर आसोदा रोड जळगाव – टोळीसदस्य, आकाश युवराज सपकाळे राजेनाबाद जळगाव – टोळीसदस्य, शुभम रघुनाथ तायडे रा जैनाबाद जळगाव – टोळीसदस्य, गणेश दिलीप सोनवणे रा जैनाबाद जळगाव – टोळीसदस्य, अनिल लक्ष्मण घुले रा रामेश्वर कॉलनी जळगाव – टोळीसदस्य, संदीप उर्फ राधे संतोष शिरसाट रा सुप्रीम कॉलनी जळगाव – टोळीसदस्य, अमोल छगन कोळी रा एमआयडीसी जळगाव – टोळीसदस्य, विकी नरेंद्र पाटील रा एमआयडीसी जळगाव – टोळीसदस्य, विशाल लक्ष्मण सोनार रा अयोध्यानगर जळगाव या १३ जणांना एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे.तर शाहरुख उर्फ डॉलर खलीलअली मो शकील रा गेंदालाल मिल जळगाव – टोळी सदस्य हा शहरात नवीन आल्याने त्याला यातून वगळले आहे.