भुसावळ/जळगाव : शहरातील एका भागात राहणार्या 23 वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
एमआयडीसी पोलिसात गुन्हा
एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत 23 वर्षीय महिला आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला असून खाजगी नोकरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. गुरुवार, 17 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास संशयीत गणेश सूर्यवंशी (पूर्ण नाव माहीत नाही) याने महिलेच्या जवळ येत विनयभंग केल्याचा आरोप आहे. या संदर्भात महिलेने रात्री आठ वाजता एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिल्यानंतर संशयीत आरोपी गणेश सूर्यवंशी विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल महेंद्रसिंग पाटील करीत आहेत.