जळगाव: खेडी येथे घरातील खिडकीतून टांगलेली पॅन्ट लोखंडी पाईपाच्या सहाय्याने ओढून त्यातील चाबीने अंगणात उभी कार घेवून लांबविल्याची तर दुसर्या घटनेत खेडी येथूनच दुचाकी लांबविल्याचे उघडकीस आले होते. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या दोन्ही गुन्ह्यातील खोजल्या वन्या तडवी रा. बिजरी गव्हाण ता.अक्कलकुव्वा , संदीप सुनील ठाकरे रा. ख्वॉजा नाईक चौक, तळोदा या दोघांना नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली होती. या संशयितांना एमआयडीसी पोलिसांनी गुन्ह्यात वर्ग केले आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता दोघांना उद्यापर्यंत पोलीस कोठडी मिळाली.
काय घडली होती घटना
खेडी येथील ट्रान्सपोर्ट व्यावसायिक स्वप्निल रामचंद्र पवार यांचे घराचे बेडरुमच्या खिडकीतून लोखंडी पाईपने पँट काढून पॅन्टमध्ये असलेल्या कारच्या चाबीच्या सहाय्याने पवार यांची अंगणातील एम.एच. बी.जे.9977 लांबविल्याची घटना 7 डिसेंबर 2019 रोजी घडली होती. तर 26 जुलै रोजी रात्री खेडी येथूनच खेमराज प्रेमचंद जंगले यांची दुचाकी लंपास झाली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. यातील खोजल्या तडवी, संदीप ठाकरे या दोघा संशयितांना नंदुरबार गुन्हे शाखेने अटक केली होती.त्याच्याकडून दुचाकी व कारही हस्तगत करण्यात आली होती. त्यानुसार मुद्देमालासह एमआयडीसी पोलिसांनी या गुन्हेगारांना ताब्यात घेतले आहे. जिल्हा न्यायालयात हजर केले असता, न्या. साठे यांनी दोघांना उद्यापर्यंत पोलीस कोठडी सुनावली.