भुसावळ- जळगाव एमआयडी पोलिस ठाणे हद्दीतील स्वीप्ट गाडीची चाके लांबवल्याप्रकरणी भुसावळातील आरोपीला सोमवारी सापळा रचून अटक करण्यात आली. गोविंदा रवींद्र बाविस्कर (32, रा.श्रीराम नगर, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपी गोविंदाने त्याचा सहकारी गणेश बाबूराव बाविस्कर (कडगाव, जि.जळगाव) सोबत जळगावातून आठ हजार 400 रुपये किंमतीचे टायर्स चोरल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल होता तर गणेश बाविस्कर यास एमआयडीसी पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याने मोबाईल चोरीसह टायर्स चोरल्याची कबुली देत या गुन्ह्यात गोविंदाचाही सहभाग असल्याची माहिती दिली होती. जळगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे एएसआय आनंदसिंग पाटील यांनी बाजारपेठ पोलिसांना मदत मागितल्यानंतर पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, पोलिस निरीक्षक देविदास पवार यांच्या मार्गदर्शनखाली सहाय्यक फौजदार तस्लिम पठाण, हवालदार सुनील जोशी, अयाज सय्यद, कॉन्स्टेबल विकास सातदिवे आदींनी आरोपीला अटक करण्यास सहकार्य केले. दरम्यान, आरोपीच्या ताब्यात दुचाकी (एम.एच.14 ई.जे.5111) व चारचाकी स्वीप्ट (एम.एच.20 बी.पी. 4401) जप्त करण्यात आली.