जळगाव : शहरातील आकाशवाणी चौकातून तरुणाची दुचाकी लांबवल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. जळगाव शहरातील निवृत्तीनगरात निलेश अशोक ठाकरे (34) हे वास्तव्यास आहेत. बुधवार, 23 मार्च रोजी ते कामानिमित्ताने त्यांच्या दुचाकी (एम.एच.19, ए.आर. 9772) ने आकाशवाणी चौकात आले होते. आकाशवाणी चौकात त्यांनी त्यांची दुचाकी उभी केली व कामासाठी ते निघून गेले मात्र काहीच वेळेत चोरट्यांनी दुचाकी लांबवली. या प्रकरणी निलेश ठाकरे यांच्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक भरत चव्हाण करीत आहेत.