जळगावातून चोरट्यांनी महागडी स्वीप्ट कार लांबवली

Thieves stole an expensive swept car from Jalgaon जळगाव : दुचाकी चोर्‍या रोखण्यात सपशेल अपयशी ठरलेल्या पोलिसांपुढे आता चारचाकी चोरट्यांचा शोध घेण्याचे आव्हान उभे राहिले आहे. शहरातील गंधर्व कॉलनीतील ज्ञानप्रभा अपार्टमेंट समोरून चोरट्यांनी दोन लाख रुपये किंमतीची स्वीप्ट लांबवली. या प्रकरणी रविवार, 25 सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

मध्यरात्री चोरट्यांनी साधली संधी
वैष्णवी भरत पाटील (21, ज्ञानप्रभा अपार्टमेंट, गंधर्व कॉलनी, जळगाव) या खाजगी नोकरदार आहेत. शनिवार, 24 सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता त्यांनी त्यांच्या मालकीची स्वीप्ट कार (क्रमांक एम.एच.19 बी.जे.7174) ही अपार्टमेंटसमोर पार्क केली. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी संधी साधली तर रविवारी सकाळी 11 वाजता कार चोरीला गेल्याची बाब लक्षात आली.

जिल्हापेठ पोलिसात गुन्हा
रविवारी सकाळी कारचा सर्वत्र शोध घेवूनही कार कुठेही दिसून न आल्याने त्यांनी तातडीने जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक प्रदीप पाटील करीत आहे.