जळगाव ः शहरातील अक्सानगरातील अर्षद शेख याकुब यांच्या घरातून तीन मोबाईल चोरीची घटना घडल्यानंतर एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल होता. या प्रकरणी भुसावळच्या आरएमएस कॉलनीतून सुनील चंद्रकांत कोळी (33, रा.निमगाव, ता.यावल) यास जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. आरोपीकडून चोरीस गेलेला मोबाईल जप्त करण्यात आला असून त्यास एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
यांनी केली कारवाई
हीकारवाई पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, सहा.पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहोम यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे एएसआय अशोक महाजन, अनिल देशमुख, रवींद्र पाटील, अनिल जाधव, विनोद पाटील, सुधाकर अभोंरे, अशरफ शेख, दादाभाऊ पाटील, दीपक पाटील, भगवान पाटील तसेच हवालदार विजय पाटील, नरेंद्र वारुळे, दिनेश बडगुजर आदींच्या पथकाने केली.