जळगाव – शहरातील तिजोरी गल्लीतील ठोक पान मसाला विक्री करणार्या दोन व्यवसायिकांवर गुरुवारी दुपारी शहर पोलिसांसह स्वयंसेवी संस्था आयएनटी काऊंटर किट अवेअरर्नर्स फाऊंडेशन(एनजीओ) संस्थेच्या पदाधिकार्यांनी संयुक्त रित्या छापेमारी करुन जवळपास साडेतीन लाखांच्या सिगारेट जप्त केल्या आहेत.
स्वयंसेवी संस्था आयएनटी काऊंटर किट अवेअरर्नर्स फाऊंडेशन(एनजीओ) संस्थेच्या पदाधिकार्यांना शहरात विदेशी बनावटीच्या सिगारेट विक्री होत असल्याची तक्रार प्राप्त झाली होती, त्यांनूसार संस्थचे प्रतिनीधी अनिल मोरे उपनिरीक्षक मिना तडवी, सहाय्यक फौजदार वासुदेव सोनवणे, विजय निकुंभ, बशीर तडवी, अक्रम शेख रतन गिते, योगेश सपकाळे अशांच्या पथकाने शहरातील तिजोरी गल्ली येथील साई ट्रेडर्स आणि आशिर्वाद ट्रेडर्स या दोन ठोक विक्रेत्यांकडे छापा टाकला असता तेथे, ब्लॅक, गुडऍण्ड गरम आदी विदेशी बनावटीच्या सिगारेट अवैध रित्या व शासनाचा कर चुकवून विक्री व साठवणुक केल्याचे आढळून आले. जवळपास साडेतीन लाख रुपयांचा माल या पथकाने ताब्यात घेतला असून तक्रारीनुसार शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.