Thieves rampage in Jalgaon: Three and a half lakhs of compensation was extended from three plots at the same time जळगाव : शहरातील अयोध्या नगरातील श्रद्धा रेसीडन्सीमधील तीन फ्लॅटमध्ये चोरट्यांनी डल्ला मारत तीन लाख 53 हजारांचा मुद्देमाल लांबविला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
बंद प्लॅट चोरट्यांना संधी
शहरातील अयोध्या नगरातील श्रद्धा रेसीडन्सी या अपार्टमेंटमध्ये संजय गोरखनाथ सिंग हे वास्तव्यास असून ते खाजगी नोकरी करुन कुटुंबाचा उदनिर्वाह करतात. त्यांच्या मुलीला रुग्णालयात दाखल केले असल्याने संजय सिंग यांची पत्नी, मुलगा व मुलगी हे हॉस्पिटलमध्ये तिच्याजवळ होते. संजय सिंग यांची रात्रपाळी असल्याने ते पावणेनऊ वाजेच्या सुमारास ड्युटीवर जाण्यासाठी ते घरातून निघून गेले. त्यानंतर दहा वाजेच्या सुमारास त्यांची पत्नी व मुलगा हे हॉस्पिटलमधून घरी आल्यानंतर त्यांना घराच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसून आले. त्यांनी तात्काळ घटनेची माहिती संजय सिंग यांना दिली. त्यांनी लागलीच घरी आले त्यांनी घरात जावून बघितले असता, त्यांना घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेला दिसून आला. तसेच घरातील गोदरेजच्या कपाटाचे लॉक तोडून त्यामध्ये ठेवलेले सोने व चांदीचेद ागिने चोरट्यांनी लांबविल्याचे त्यांना दिसून आले.
एकाच अपार्टमेंटमध्ये चोरी
चोरट्यांनी संजय सिंग यांच्या घरात डल्ला मारल्यानंतर त्यांनी याच अपार्टमेंटमध्ये राहणारे संतोष कुमार नागर व अशोक विश्वकर्मा यांच्या घराचा कडी कोयंडा तोडून डल्ला मारला. याठिकाणाहून देखील त्यानी रोख रक्कम व सोन्याचे दागिने लांबविले.